Vithala Aaji Mya Tula Pahile Re – विठ्ठला आजी म्या

Marathi Abhang Vithala Aaji Mya Tula Pahile Re Lyrics विठ्ठला आजी म्या. 

विठ्ठला आजी म्या आजी म्या आजी म्या
तुला पहिले रे ।।
परब्रह्म विठ्ठल परब्रह्म विठ्ठल
विटेवरी राहीले देव विटेवरी राहीले

विठ्ठला आजी म्या आजी म्या आजी म्या
तुला पहिले रे ।।

जमला मेळा वैष्णवांचा २
जयजयकार विठूनामाचा २
गोडवा गाईला मुखाने गोडवा गाईला

विठ्ठला आजी म्या आजी म्या आजी म्या
तुला पहिले रे ।।

वैष्णवासंगे कीर्तनात २
नाचत होता पंढरीनाथ २
माता रखुमाईला घेऊन माता रखुमाईला

विठ्ठला आजी म्या आजी म्या आजी म्या
तुला पहिले रे ।।

एकनाथाचा केला उद्धार २
भावफुलांचा गुंफुनी हार २
चरणावरी वाहिला विठूच्या चरणावरी वाहिला

विठ्ठला आजी म्या आजी म्या आजी म्या
तुला पहिले रे ।।

Vithala Aaji Mya Tula Pahile Re Lyrics Video

Scroll to Top