Sang Kadhi Kalnar Tula Lyrics – सांग कधी कळणार तुला

Sang Kadhi Kalnar Tula Lyrics in Marathi सांग कधी कळणार तुला song is from 1969 movie “Apradh” sung by the legendary singer Mahendra Kapoor

सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणाऱ्या फुलातला…

गंधित नाजुक पानांमधुनी,
सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला
धुंदणाऱ्या सूरातला…

निळसर चंचल पाण्यावरती,
लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला
नाचणाऱ्या जलातला…

जुळता डोळे एका वेळी,
धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला
दोन वेड्या जिवातला…

Scroll to Top