This is song Puja Ho Dattaguru Din Raat Lyrics in Marathi. पुजा हो दत्तगुरू दिनरात song by Gulab Bhedodkar, Music and singer R N Paradkar.
पुजा हो दत्तगुरू दिनरात
सौख्य शांतिचा प्रसाद मिळतो
दत्तगुरू पूजनात
ब्रह्म विष्णू सवे महेश्वर
त्रैमूर्तीचे रूप मनोहर
अनसूयेच्या सदनी भूवर
रमले आनंदात
शामल नयनी प्रेमळ दृष्टी
सदा कृपेची करिती वृष्टी
भक्त जनांच्या पाठीवरती
फिरवी कोमल हात
प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर
उद्धरती हे सर्व चराचर
अत्री नंदन करुणा सागर
नित्य असो स्मरणात