This is song Pratham Tula Vandito Lyrics in Marathi. प्रथम तुला वंदितो कृपाळा is a soulful composition that showcases the beauty of love and devotion.
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना, गणराया
विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तिमिर हारका
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभूराया
सिद्धि विनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला
सिंदूरवदना विद्याधिशा
गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे
हा भवसिंधू तराया
गजवदना तव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया