Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi. Gajanan Maharaj is a Hindu saint from the 19th century.
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥
जयदेव जयदेव
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी॥
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥
जयदेव जयदेव
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥
धाता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना।
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥
जयदेव जयदेव
लीला अनंत केल्या बंकट सदनास।
पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस॥
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥
जयदेव जयदेव
व्याधी वारून केलें कैकां संपन्न।
करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन॥
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥
जयदेव जयदेव
जय जय सतचित-स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥
जयदेव जयदेव
नमस्काराष्टक
योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरूचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरूच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।
ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।
संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।
पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरूमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।
तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरूनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।
जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।
बाधे तृषा गुरूवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।
स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।
प्रदक्षिणा
यानि कानिच पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।
क्षमापनम्
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पुजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
जय जय रघुवीर समर्थ
Shree Gajanan Marahaj Aarti Shegaon
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ऽ ऽ…