Bolava Vitthal Lyrics – बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 1982

This is Abhang Bolava Vitthal Lyrics. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल is a soulful devotional song, dedicated to the Hindu deity Lord Vitthala.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल l
करावा विठ्ठल जीवभाव ll

येणें सोसें मन जालें हांवभरी l
परती माघारी घेत नाहीं ll

बंधनांपासूनि उकलली गांठी l
देता आली मिठी सावकाश ll

तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें l
कामक्रोधें केलें घर रितें ll

Bolava Vitthal Lyrics Video

Scroll to Top