Avirat Othi Yave Lyrics in Marathi. अविरत ओठी यावे नाम Ram bhajan by Arun Date.
अविरत ओठी यावे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
रामनाम हे सदा सुखाचे
निधान जाणा परमेशाचे
पतितपावन अवघे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
जानकीची जणू जीवनज्योती
प्रभु रामाची कोमल मूर्ती
मंगल दर्शन पूर्ण विराम
श्रीराम जय राम जयजय राम
पंचप्राण हे पवनसूताचे
राम जणू नि:श्वास तयांचे
तनू संजीवन सुंदर धाम
श्रीराम जय राम जयजय राम