Amhi Bighadlo Tumhi Lyrics – आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

This is song Amhi Bighadlo Tumhi Lyrics आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना.

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना
आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

सद्गुरुंच्या संगे शिष्य बि घडला
शिष्य बि घडला सद्गुरुचि झाला

सागराच्या संगे नदी बी घडली
नदी बी घडली सागरची झाली

परिसाच्या संगे लोह बी घडले
लोह बी घडले सुवर्णमय झाले

विठ्ठलाच्या संगे तुका बि घडला
तुका बी घडला विठ्ठलमय झाला

भास्कराच्या सांगे थेम्ब बि घडला 
थेम्ब बि घडला पर्जन्य ची झाला 

ज्ञान ज्योती सांगे वात बी घडली 
वात बी घडली प्रकाशित झाली 

कीर्तनाच्या संगे टाळ बी घडले 
टाळ बी घडले नाद ब्रह्म झाले 

Amhi bi Ghadlo Lyrics Video

Scroll to Top