This is song Aaj Ayodhya Sajali Lyrics in Marathi and English. श्रीरामाच्या पूजेसाठी आज song from the Marathi movie Pach Najuk Bote.
फुले प्रीतिची आनंदाच्या अश्रूंनीं भिजली
श्रीरामाच्या पूजेसाठी
आज अयोध्या सजली सजली
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी
दाही दिशा गाजली
पंचप्राण हे लावून ज्योती
सर्वांगाने करिन आरती
भावभक्तीची टाळमंजिरी,
तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्यानें
एकरूप हो दोन जीवनें
तुझ्या कृपेची अमृतवेली,
मनोमनी रुजली