Shukratara Lyrics in Marathi – शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी

This is song Shukratara Lyrics in Marathi and English. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे song by Mangesh Padgaonkar and music by Shrinivas Khale.

शुक्रतारा मंद वारा,
चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे स्वप्न वाहे,
धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या
मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दांत सांगू
भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे
लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या
आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे
गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने
अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी
भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नांत मी
ते ये करी जागेपणी
दाटुनि आलास तू रे
आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी
आता फुलांनी जीव हा

Shukra Tara Mand Vara Lyrics in English

Scroll to Top