Ratris Khel Chale Lyrics in Marathi रात्रीस खेळ चाले is from movie Ha Khel Savlyancha (1976) sung by Mahendra Kapoor.
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा
या साजिर्या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा