Vaje Mrudung Taal Veena Lyrics – वाजे मृदुंग टाळ वीणा

This is song Vaje Mrudung Taal Veena Lyrics in Marathi and English. वाजे मृदुंग टाळ वीणा lyrics by Ajit Kadkade.

वाजे मृदुंग टाळ वीणा
ये रे नाचत गौरी गणा||
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
नाच नाच रे गजानना

पायी बांधून घुंगुरवाळा
येई ठुमकत तू लडीवाळा
जना आवडे तव हा चाळा
देई आनंद गौरी बाळा
दुडूदुडू ये रे लुटूलुटू ये रे
शिवसुता वेल्हाळा||

नाच नाच रे गजानना 
वाजे मृदुंग टाळ वीणा ||1||
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

तुझ्या चिंतनी जमले सारे
खाली आले नभातील तारे
नाचे चैतन्ये अवघे वारे
पाना-फुलात भरलासी तू रे
कर्पूरगौरा, जगदोधारा,
ये धरणी बल्लाळा ||

नाच नाच रे गजानना 
वाजे मृदुंग टाळ वीणा ||2||
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

तू देवांचा देव खरा
आदिनाथ तू मंगलकारा
देई कृपेच्या अमृतधारा
तारी विश्वाचा सर्व पसारा
हे विघ्नेशा, हे जगदीशा,
हे धरणी नी परमेशा ||

नाच नाच रे गजानना 
वाजे मृदुंग टाळ वीणा ||3||
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

Vaje Mrudung Taal Veena Lyrics Video

Scroll to Top