Marathi Abhang Kar Katavari Ubha Vitevari Lyrics in Marathi कर कटेवरी उभा विटेवरी.
कर कटेवरि उभा विठेवरि
युगे अठ्ठाविस राहिला |
ऐसा लावण्य रुपाचा सोहळा
अजी म्या डोळा पाहिला ||धृ ||
तुळशीहार गळा कासे पितांबर पिवळा ||
वर्णिताची थोरि शेषादिक श्रमला ||१||
मकरकुंडले तळपती दोन्ही कानी ||
रत्नजडीत मुकुट शिरावरी शोभला ||२||
बापरखुमा देवीवरु विठ्ठलू सावळा ||
पंढरिये नगरि येवोनी राहिला ||३||