This is a beautiful song Koti Koti Rupe Tuzi Lyrics in Marathi – कोटी कोटी रूपे तुझी song lyrics by Yashwant Dev.
कोटी कोटी रूपे तुझी,
कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधू तुला,
तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी,
तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणून देतो
फुलाला सुवास
चराचरा रंगविशी,
रंग तुझा कोणता रे
कधी दाह ग्रीष्माचा तू,
कधी मेघ ओला
जनी निर्जनी ही तुझा
पाय रोवलेला
तुझी खुण नाही ऐसा
गाव तरी कोणता रे
खरे रुप देवा तुझे,
कोणते कळेना
तूच विटेवरी तूच
वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा
शब्द तरी कोणता रे