Lallati Bhandar Lyrics - नदीच्या पल्याड आईचा डोंगुर

Lallati Bhandar Lyrics in Marathi. नदीच्या पल्याड आईचा डोंगुर lyrics from 2009 marathi movie Jogwa.

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्‍हावं तू
देवी माझ्या अंतरी र्‍हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू

डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन
घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्‍तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्‍तीचा सागर

खणानारळानं वटी मी भरीन,
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला

घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार

यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्‍तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्‍तीचा सागर

Lallati Bhandar Lyrics Video

Credit:

Lyricist : Sanjay Krishnaji Patil,
Singer : Ajay Gogavale,
Music Director : Ajay - Atul,
Movie : Jogwa - 2009

For more Beautiful Song Lyrics

Info:

This is song Lallati Bhandar Lyrics. नदीच्या पल्याड आईचा डोंगुर Lallati Bhandar is a Marathi song composed and sung by Ajay-Atul. It was released in 2009, as part of the soundtrack for the Marathi film Jogwa. The song is written by Ajay-Atul and has been composed by them.

The song is featured in the film's opening credits, and has been praised for its catchy tune and lyrics. The song has become very popular in Maharashtra, with the lyrics having been adopted by fans as a rallying cry. The song has been widely covered byAjay Gogavale.