Maan Velavuni Lyrics - मान वेळावुनी धुंद बोलू नको

The song Maan Velavuni Lyrics in Marathi. मान वेळावुनी धुंद बोलू नको song Lyrics by Mangesh Padgaonkar.

मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं

आज वारा बने रेशमाचा झुला
ही खुशीची हवा, साद घाली तुला
मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे
रुप पाहून हे चंद्र भागेल गं
दृष्ट लागेल गं......

पाहणे हे तुझे, चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
दृष्ट लागेल गं.......

Maan Velavuni Lyrics Video

Credit:

Lyricist: Mangesh Padgaonkar
Singer: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
For more Beautiful Song Lyrics

Tags:

Maan Velavuni Lyrics - मान वेळावुनी धुंद बोलू नको. Marathi Song by Mangesh Padgaonkar, singer Arun Date and Music by Yadhwant Deo.