Tuzya Krupene Din Ugave Ha Lyrics. तुझ्या कृपेने दिन उगवे हा song expresses the devotional feeling of gratitude for Lord Ganesha’s small blessings.
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
सिंधूर वंदना तुजला नमितो दर्शन दे मजला
सुखकारक तू दुःख हरुनिया तारी प्रभु सकला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
तू आमुची प्रेरणा
सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा
जन जीवनी या तूच शुभंकरा शुभदिन फुलवावा
कर्पूर गौरा गणनायक तू
कर्पूर गौरा गणनायक तू
गाउनी तव कवना