Datta Darshanala Jayacha Lyrics in Marathi - दत्त दर्शनाला जायचं जायचं

This is song Datta Darshanala Jayacha Lyrics in Marathi. दत्त दर्शनाला जायचं जायचं song by Raghunath Salokhe and music by Ram Kadam.

दत्त दर्शनाला जायचं जायचं
आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||

गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट
या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||

रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
या या नजरेस आणि काही येईना || २ ||

दत्त हाच पांडुरंग दत्त गाऊनि अभंग
या भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||

नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ
खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||

Datta Darshanala Jayacha Lyrics Video

Credit:

Lyricist: Jagdish Khebudkar
Singer: Raghunath Salokhe
Music Director: Ram Kadam

For more Beautiful Song Lyrics

Tags:

Datta Darshanala Jayacha Lyrics in Marathi. #DattaDarshanalaJayachaLyrics - दत्त दर्शनाला जायचं जायचं.by Jagdish Khebudkar and Music by Ram Kadam.